बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    30.04.2026:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा  यांनी लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे  तसेच लोक भवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    30.04.2026: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा…

    तपशील पहा
    28.04.2026 : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज( एआययू )च्या १०० व्या वार्षिक महासभेचे तसेच कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाले.  देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोन्मेष व  संशोधनासह सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असून या माध्यमातून विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. उदघाटन सत्राला एआययूचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनय कुमार पाठक, महासचिव डॉ. श्रीमती पंकज मित्तल, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे , प्र-कुलगुरु डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात “ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन” स्मरणिकेचे तसेच “इंडियन युनिव्हर्सिटी जर्नल” चे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

    28.04.2026: ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्त्वाचे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्त्वाचे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा असोसिएशन ऑफ इंडियन…

    तपशील पहा
    25.04.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे १५ व्या वार्षिक ‘लीगल  इरा इंडियन लीगल अवॉर्ड्स’ समारंभाला सुरुवात झाली. एसोसिएशन ऑफ इंडियन लॉ फर्म्स आणि लीगल इरा मीडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेले हे पुरस्कार विधी क्षेत्रातील व्यावसायिक आणि फर्म्सना प्रदान केले जातात. उदघाटन सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय करोल व न्या. उज्जल भुयान, राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मनीष पितळे व न्या. हितेन वेणेगावकर, सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती हिमा कोहली,  एसोसिएशन ऑफ इंडियन लॉ फर्म्सचे अध्यक्ष निलेश त्रिभुवन,  लीगल इरा मीडिया ग्रुपच्या संस्थापिका आकृती रायजादा, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच वरिष्ठ वकील, जनरल काउन्सेल्स आणि विधी फर्म्सचे भागीदार उपस्थित होते.

    25.04.2026: देशाच्या प्रगतीमध्ये विधी शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    देशाच्या प्रगतीमध्ये विधी शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशाच्या प्रगतीमध्ये विधी शिक्षणाची भूमिका…

    तपशील पहा
    कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    24.04.2026 : कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा नामशेष होत असलेल्या कलांचे…

    तपशील पहा
    कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअप्स सुरु करण्याच्या राज्यपालांच्या कृषि विद्यापीठांना सूचना

    23.04.2026 : कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअप्स सुरु करण्याच्या राज्यपालांच्या कृषि विद्यापीठांना सूचना

    कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअप्स सुरु करण्याच्या राज्यपालांच्या कृषि विद्यापीठांना सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु…

    तपशील पहा
    19.04.2026:  पालघर जिल्ह्यातील ओसरवीरा  येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचे लोकार्पण  केले. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज डहाणू येथे केले. यावेळी  भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी,  योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.  पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची  समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक 'आदर्श गाव' संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

    19.04.2026: विकसित भारताच्या संकल्पात पालघरचा सहभाग अनिवार्य – राज्यपाल

    विकसित भारताच्या संकल्पात पालघरचा सहभाग अनिवार्य – राज्यपाल जिष्णू देव वर्मा डहाणूत आरोग्य सुविधांचे लोकार्पण…

    तपशील पहा
    19.04.2026:  महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी  लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    19.04.2026: महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन

    महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा…

    तपशील पहा
    Governor inaugurates Solar Energy Project at Lok Bhavan, Nagpur

    16.04.2026: राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

    राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या…

    तपशील पहा
    17.04.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला. 
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी भरभरुन शाबासकी दिली. भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकर, समितीचे सदस्य, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर उपस्थित होते.

    17.04.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

    महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून शाबासकी…

    तपशील पहा
    16.04.2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा सहावा दीक्षान्त समारंभ  वर्धा येथे संपन्न झाला.  यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर तसेच विश्वविद्यालयाच्या कुलपती प्रो.कुमुद शर्मा उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध विद्याशाखेच्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदवी प्रदान करण्यात आल्या.

    16.04.2026: विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी…

    तपशील पहा
    15.04.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटीची) ७८ व्या तुकडीला   नागपूर येथे संबोधित केले. या सोहळ्याला राज्यापाल जिष्णू देव वर्मा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, महासंचालक सीबीचेन के मॅथ्यु , प्रशासकीय सदस्य पंकजकुमार मिश्रा व मान्यवर उपस्थित होते.

    15.04.2026 नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह अधिकाऱ्यांनी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचे – राष्ट्रपती

    नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह अधिकाऱ्यांनी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

    तपशील पहा
    15.04.2026: केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय  दीक्षांत समारंभ  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे संपन्न झाला. या समारंभात राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॅा. प्रशांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात विविध अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्ता यादीत  आलेल्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदवीप्रदान करण्यात आले. त्यानंतर दीक्षांत समारंभात एकूण 210 विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या गौरवार्थ पदव्या व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यामध्ये 129 एमबीबीएस, 29 एमडी/एमएस, 35 बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग, 5 एम.एस्सी. आणि 12 संलग्न व आरोग्यसेवा शाखांतील पदवीधरांचा समावेश आहे.

    15.04.2026 संशोधन, जिज्ञासा आणि निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा – राष्ट्रपती

    संशोधन, जिज्ञासा आणि निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वैद्यकीय क्षेत्रात नैतिक…

    तपशील पहा