बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    01.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोक भवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते लोकनृत्यासह सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते.

    01.06.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

    महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या…

    तपशील पहा
    31.05.2026: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे अह‍िल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.   यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

    31.05.2026: राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

    राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    Governor presides over the Summit, jointly organized by Hetu Charitable Trust and the District Legal Services Authority in Mumbai

    30.05.2026: “विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल”: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट चष्मे, व्हीलचेअर, शिलाई मशीन व लॅपटॉप वाटप “विकसित राष्ट्र…

    तपशील पहा
    30.05.2026: इस्कॉनच्या भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनतर्फे विकसित करण्यात आलेल्या समग्र कर्करोग उपचार पुनर्वसन केंद्र - ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज खारघर येथील इस्कॉन मंदिर परिसरात संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते  संगीतकार शशांक कट्टी यांनी तयार केलेल्या ‘कृष्ण संजीवनी’ या समग्र संगीत उपचार (Holistic Music Therapy) उपक्रमाचे संगीत ट्रॅक्स स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला इस्कॉन मंदिर खारघरचे  अध्यक्ष डॉ. सूर दास, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनचे संचालक डॉ. वैष्णवांग्री सेवक दास तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

    30.05.2026: विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प – राज्यपाल

    विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प – राज्यपाल जिष्णू देव वर्मा खारघर येथील…

    तपशील पहा

    31.05.2026 सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात पावित्र्य होते: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात पावित्र्य होते: राज्यपाल जिष्णु देव वर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा…

    तपशील पहा
    29.05.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुरुषोत्तम मासानिमित्त जोगेश्वरी मुंबई येथे सुरु असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञाला भेट देऊन उपस्थित भाविक श्रोत्यांशी संवाद साधला. 
श्रीमद भागवत ही चारित्र्य संपन्न समाज घडविणारी कथा असून त्यातून आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यपालांनी कथाकर्ता श्री महावीर शरण शास्त्री यांचा सत्कार केला तसेच श्रीमद्भागवत महायज्ञ आयोजक सावरकर फाउंडेशनचे अभिनंदन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक रुपेश सावरकर उपस्थित होते.

    29.05.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शुक्रवारी…

    तपशील पहा
    नौदल प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन

    28.05.2026 : नौदल प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन

    नौदल प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन भारतीय नौदलाच्या प्रमुख पदी नियुक्ती…

    तपशील पहा
    28.05.2025 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

    28.05.2026: राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

    राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु…

    तपशील पहा

    27.05.2026: ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा

    ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी…

    तपशील पहा
    26.05.2026: 'टीबी मुक्त भारत अभियान' मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'टीबी मुक्त मुंबई' मोहिमेचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील सत्कार करण्यात आला. लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित  'टीबी मुक्त मुंबई' मोहिमेच्या उदघाटनला मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ ज्योती गायकवाड आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य  समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका तसेच महानगरपालिकेचे  अधिकारी उपस्थित होते. यावेळी 'टीबी मुक्त मुंबई' च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्र येथे क्षयरोग अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचेशी संवाद साधला तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. या कार्यक्रमात राज्यपालांनी ३० क्षयरुग्णांच्या पोषण पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना निक्षय मित्र प्रमाण पत्र प्रदान केले.

    26.05.2026:राज्यपालांच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाला सुरुवात

    राज्यपालांच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाला सुरुवात मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – राज्यपाल जिष्णु…

    तपशील पहा

    25.05.2026: राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवार पासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

    राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवार पासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत मंगळवारी धारावी व…

    तपशील पहा
    22.05.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, रमेश गोवानी, खासदार मनोज तिवारी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

    22.05.2026 : राज्यपालांची सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती

    राज्यपालांची सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शुक्रवारी (दि.२२ मे) मुंबई येथे…

    तपशील पहा