बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    Governor inaugurates an International Workshop on “Mid-TRL Technology Transition and Innovation Acceleration in Pune

    10.06.2026: संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग यांच्यातील दरी दूर करण्यासाठी समन्वयाची गरज– राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग यांच्यातील दरी दूर करण्यासाठी समन्वयाची गरज– राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुणे,…

    तपशील पहा
    09.06.2026:महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महा पत्रकार अधिवेशन’ पार पडले. पत्रकारांनी सामान्य नागरिक तसेच समाजातील वंचित घटकांच्या समस्या सातत्याने प्रकाश झोतात आणत राहाव्यात, असे राज्यपालांनी आवाहन केले. याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, गौर गोपाल दास, सकाळ मीडिया समूहाचे समूह संपादक निलेश खरे, ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक आणि मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील विविध भागांतून आलेले पत्रकार उपस्थित होते.

    09.06.2026: नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी –राज्यपाल

    नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी –राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    09.06.2026:  क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १२६ व्या बलिदान दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह १५ आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले व वृक्षारोपण केले. कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी आदिवासी कलाकारांनी लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी समाजातील विविध खासदार व आमदार, ज्येष्ठ तारपा वादक व लोककलावंत पद्मश्री भिकल्या धिंडा तसेच निमंत्रित उपस्थित होते

    09.06.2026:आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई, दि….

    तपशील पहा
    08.06.2026:  महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत लोकभवन, मुंबई येथे संवाद साधला. हा कार्यक्रम भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च शिक्षण विभागचे उपसचिव श्रेयांश मोहन, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. मनवा दिवेकर तसेच वरिष्ठ प्रधान तांत्रिक अधिकारी डॉ. शांती कलीपटनपू, तिरुपती येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील मानव व सामाजिक विज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बिभूती कच्छप, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. रामामूर्ती, आयआयएसईआर येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाणे, आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे सदस्य, आयसरचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

    08.06.2026: ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

    ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सोमवारी (दि….

    तपशील पहा
    06.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे आयोजित 'शक्ती समिट-२०२६'  पुणे इंटरनॅशनल सेंटर पाषाण येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (निवृत्त), क्विंटसेन्स फ्रॅग्रान्सेस प्रा. लि.चे अध्यक्ष भरत कामटे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, एचईएफचे अध्यक्ष तथा ‘पार्टेक्स एआय’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गौरव त्रिपाठी, फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक आदी उपस्थित होते.

    06.06.2026 : तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज-राज्यपाल जिष्णू देव वर्मा

    तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज-राज्यपाल जिष्णू देव वर्मा पुणे, दि. ६: तरुण…

    तपशील पहा
    05.06.2026:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भामला फाउंडेशन व्दारे आयोजित कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण हितासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना 'एन्व्हायरमेंट लीडरशिप' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते देशव्यापी पर्यावरण जागृती मोहीम आणि भूमी नमस्कार या गीताचा शुभारंभ करण्यात आला. हवामान कृती आणि शाश्वत विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची तातडीची गरज असून आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत, असे राज्यपालांनी  सांगितले. राज्यपालांनी “भूमी नमस्कार” या गीताच्या निर्मिती चमूचे अभिनंदन केले. हे गीत प्रसून जोशी यांनी लिहिले असून आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केले आहे. या कार्यक्रमाला  गौऱ गोपाल दास, लक्ष्यराज सिंह मेवाड, विकास खन्ना, विजय कारिया, सुजित पाटील,  सीमा सिंह,  हिमेश रेशमिया, अभिनेते मलायका अरोरा, सोनू सूद व वेदांग रैना तसेच पर्यावरणप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

    05.06.2026:पर्यावरण म्हणजेच विकास; शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल

    पर्यावरण म्हणजेच विकास; शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा…

    तपशील पहा
    03.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. 'वर्मा फाउंडेशन' आणि 'फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' (F-TAM) यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात संस्थेतील काही कलाकारांनी लोकगीते लोकनृत्यासह सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे (NCLT) माजी न्यायिक सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) मदन गोसावी, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, 'मराठी-तेलगू मंच'चे संस्थापक आणि 'फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, नेल्लोर येथील 'नाट्यशिरोमणी' शेख नादिया, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

    03.06.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन साजरा

    महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन साजरा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख…

    तपशील पहा
    02.06.2026:भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग व त्यांचे सोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी (दि. २ जून) लोकभवन, मुंबई येथे स्वागत समारोहाचे आयोजन केले. यावेळी आयोजित स्नेहभोजनाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    02.06.2026: भगवान बुद्ध उभय देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा : राज्यपाल

    आर्थिक सहकार्य, व्यापार व गुंतवणूक वाढविण्याच्या हेतूने भारत भेट : उ मिन आँग लॉन्ग भूकंप…

    तपशील पहा
    02.06.2026: सध्या भारत दौऱ्यावर असलेले म्यानमार प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते. म्यानमारच्या राष्ट्राध्याक्ष्यांच्या सन्मानार्थ राज्यपालांनी आज संध्याकाळी लोकभवन येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.

    02.06.2026: म्यानमार राष्ट्राध्यक्षांचे मुंबई येथे आगमन

    म्यानमार राष्ट्राध्यक्षांचे मुंबई येथे आगमन सध्या भारत दौऱ्यावर असलेले म्यानमार प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग…

    तपशील पहा
    01.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोक भवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते लोकनृत्यासह सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते.

    01.06.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

    महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या…

    तपशील पहा
    31.05.2026: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे अह‍िल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.   यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

    31.05.2026: राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

    राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    Governor presides over the Summit, jointly organized by Hetu Charitable Trust and the District Legal Services Authority in Mumbai

    30.05.2026: “विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल”: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट चष्मे, व्हीलचेअर, शिलाई मशीन व लॅपटॉप वाटप “विकसित राष्ट्र…

    तपशील पहा