बंद

  अभिलेखागार

  प्रस्तावना

  राजभवन, मुंबई[

  राजभवन, मुंबई

  प्रस्तावना

  पूर्वी गव्हर्नमेंट हाऊस म्हणून ओळखले जाणारे  मुंबई राज भवन, इसवी सन 1665 पासून सत्तेचे स्थान आहे, जेव्हा सर हम्फ्रे कुक यांनी इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत पूर्वीच्या बॉम्बे प्रेसीडेंसीमध्ये पहिले इंग्रज गव्हर्नर म्हणून पोर्तुगीजांकडून बॉम्बे बेटाचा कार्यभार स्वीकारला होता. बॉम्बेचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन कॉलव्हिल होते, त्यांनी ५ जानेवारी १९४८ पर्यंत काम केले.

  राजभवन परिसरातच संयुक्त महाराष्ट्र राज्याचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री. श्री प्रकाश आणि पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण हे ही उपस्थित होते. तेंव्हा पासून, राज भवनाने, जे आता राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे कार्यालय आणि निवासस्थान आहे, राज्याच्या कारभारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

   

  1 मे 1960 रोजी, राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश, भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण.

  अभिलेखागार कक्ष विकसित करण्यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाला सल्ला देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरालेखशास्त्रज्ञ (दिवंगत) श्री सदाशिव गोरक्षकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती. समितीचे इतर मान्यवर सदस्य होते प्रा. मुशिरुल हसन, संचालक, भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार, श्रीमती वृंदा पाठारे, चीफ आर्काइव्हिस्ट, गोदरेज आर्काइव्हज, डॉ. श्रीमती वर्षा शिरगावकर, प्रमुख, इतिहास विभाग, SNDT महिला विद्यापीठ आणि श्री अशोक कपूर, सेवानिवृत्त चीफ आर्काइव्हिस्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्काइव्ह्ज.

  राजभवनात एक “अर्काइव्ह सेल” स्थापन करण्यात आला आहे जिथे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कागदपत्रांचे वर्गीकरण आणि अनुक्रमणिका केली जात आहे. डिजिटलायझेशन आणि मायक्रोफिल्मिंगच्या माध्यमातून या नोंदी जतन करण्याचे काम केले जाते. हे रेकॉर्ड विद्यार्थी, संशोधक, शैक्षणिक सदस्य आणि इच्छुक नागरिकांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने उपलब्ध आहेत.

   

   

  आमचा संग्रह

  आजच्या दिनांकापर्यंत, 1930 पर्यंतच्या 1 लाख दस्तऐवजांपेक्षा अधिक दस्तऐवज असलेल्या 5000 फायलींचे वर्गीकरण व निर्देशसूची करण्यात आली आहे. वर्गीकरण व निर्देशसूची करण्याचे काम प्रगतीपथावर असून आणखी काही फायलींची या संग्रहामध्ये भर पडेल. या फायली, राज्यपालांची सांविधानिक कार्ये, महाराष्ट्र राज्याला महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या भेटी, राज्यपाल प्रमुखपदी असलेल्या व त्यांनी प्रोत्साहन दिलेल्या विविध संस्था, विविध राज्यपालांची भाषणे, प्रशासकीय बाबी आणि इतर समकालीन प्रश्न, इत्यादी अनेक विविध विषयांशी संबंधित आहेत.

  पूर्वीच्या राज्यपालांची जुनी व दुर्लभ छायाचित्रे देखील संग्रहित करण्यात येत आहेत. त्यांचे जतन करण्यात येत आहे व डिजिटाईज करण्यात येत आहेत.

  एकात्मीकृत सूच्या

  यशवंतराव चव्हाण.


  1 मे 1960 रोजी, राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश, भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण.

  संशोधकांच्या उपयोगासाठी, निर्देशसूची व विषय वर्गीकरण यांसह विविध दस्तऐवजांची सूची राजभवन अभिलेखागारामध्ये उपलब्ध आहे. सूची बघण्यासाठी लींकवर क्लीक करा.

  प्रवेश धोरण

  पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल. त्यांना, त्यांच्या संबंधित विभागांच्या / संस्थांच्या प्रमुखाकडून तसे पत्र सादर करावे लागेल.

  इतिहासकार, शैक्षणिक संस्थांचे सदस्य, आवड असणारे नागरिक आणि राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी हे ही राजभवनाच्या अभिलेखागारातील अभिलेख पाहू शकतात.

  पूर्वी ठरविलेल्या भेटीच्या वेळेद्वारे, कामाच्या दिवशी (सोमवार ते शनिवार, दुसरा व चौथा शनिवार सोडून) सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येईल.

  राजभवन अभिलेखागारामध्ये उपलब्ध कागदपत्रांची सूची

  संपर्क करा

  राज्यपालांचे सचिव,

  राजभवन,

  मलबार हिल,

  वाळकेश्वर मार्ग,

  मुंबई -400 035.

  दूरध्वनी: 022- 2363 2343/ 2369 4799/ 2369 2426