बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    10.07.2026:'फॉर्च्युन इंडिया' मासिकातर्फे देण्यात येणार्या 'फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन' पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल फोर सीझन्स मुंबई येथे झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.  उदघाटन सत्राला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका, फॉर्च्युन इंडिया समूहाचे मुख्य संपादक सौरव मुजुमदार आदी उपस्थित होते. यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.

    10.07.2026: महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’ नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती…

    तपशील पहा
    10.07.2026:  रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व आय स्पार्क फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'स्टार्ट-अप फ्रंटियर १.०' या एक दिवसाच्या स्टार्टअप प्रदर्शन व चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी 'एचपी क्रिएटिव्ह गेमिंग गराज' तसेच मेट्रोपोलीस कंपनीनें विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या 'मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी' या नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे उदघाटन केले. राज्यपालांच्या उपस्थितीत आयआयटी मद्रास प्रवर्तक व रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांमध्ये झालेल्या सहकार्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट दिली तसेच युवा उद्योजकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला कौशल्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, एचपी कंपनीच्या उपाध्यक्ष इप्सिता दासगुप्ता, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. वैभव नरवडे तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते.

    10.07.2026: कौशल्य शिक्षण समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत न्यावे: राज्यपाल

    मुंबईत एक दिवसीय स्टार्टअप महोत्सव संपन्न कौशल्य शिक्षण समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत न्यावे: राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    10.07.2026:  रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व आय स्पार्क फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'स्टार्ट-अप फ्रंटियर १.०' या एक दिवसाच्या स्टार्टअप प्रदर्शन व चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी 'एचपी क्रिएटिव्ह गेमिंग गराज' तसेच मेट्रोपोलीस कंपनीनें विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या 'मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी' या नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे उदघाटन केले. राज्यपालांच्या उपस्थितीत आयआयटी मद्रास प्रवर्तक व रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांमध्ये झालेल्या सहकार्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट दिली तसेच युवा उद्योजकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला कौशल्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, एचपी कंपनीच्या उपाध्यक्ष इप्सिता दासगुप्ता, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. वैभव नरवडे तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते.

    10.07.2026: कौशल्य शिक्षण समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत न्यावे: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मुंबईत एक दिवसीय स्टार्टअप महोत्सव संपन्न कौशल्य शिक्षण समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत न्यावे: राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    Governor all praise for the players from India's First Blind Women's Cricket Team

    08.07.2026: अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद : राज्यपाल जिष्णु देव वर्मा दृष्टिहीन महिला राष्ट्रीय…

    तपशील पहा
    08.07.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिवस मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ८ जुलै १९४५ रोजी या संस्थेची स्थापना केली होती. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२६’ विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच उद्योजक पद्मश्री अशोक खाडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तसेच  पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्ज्वल निकम, विश्वस्त अॅड. बी. के. बर्वे, डॉ वेंकट स्वामी व अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सोसायटीच्या कार्यकारिणीचे सदस्य चंद्रशेखर कांबळे तसेच पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.

    08.07.2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा राज्यघटनेचे…

    तपशील पहा
    07.07.2026:  महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या 'टीबी मुक्त मुंबई' अभियान अंतर्गत आज कचरा वेचक महिलांसाठी फाईन आर्ट सोसायटी चेंबूर मुंबई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व 'नमस्ते' योजनेचा शुभारंभ करण्यात आला.  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना 'आयुष्यमान कार्ड' व आरोग्य रक्षणासाठी पीपीई किट देण्यात आले.  कार्यक्रमाला कचरा वेचक महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत असलेल्या सुशीला साबळे, नगर सेविका व प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशा मराठे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा, ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थानं) डॉ किरण दिघावकर व देवनार परिसरातील कचरा वेचक महिला आदी उपस्थित होते.

    07.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी टीबी मुक्त मुंबई अभियान

    राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी टीबी मुक्त मुंबई अभियान महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या…

    तपशील पहा
    05.07.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात थोर  शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महर्षी कर्वे यांनी सन १९१६ साली स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा समारंभ संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी महर्षी कर्वे कुटीरला भेट देऊन तेथील स्मृतीस्थळाचे अवलोकन केले. यावेळी विद्यापीठातर्फे आयोजित ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ अंतर्गत आयोजित प्रदर्शनालाही राज्यपालांनी भेट देऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते सर्वोत्तम महाविद्यालय, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम शिक्षकेतर कर्मचारी, सर्वोत्तम एनसीसी कॅडेट, सर्वोत्तम माजी विद्यार्थी व महर्षी कर्वे खेलरत्न पुरस्कार विजेते यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी, विद्यापीठाच्या कुलगुरु  प्रा. उज्ज्वला चक्रदेव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नंदवडेकर उपस्थित होते.

    05.07.2026: एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण; ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’चे उद्घाटन

    एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण;…

    तपशील पहा
    03.07.2026: दिव्यांगांचे कौशल्य प्रशिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एज्युकेशन ट्रस्ट' या संस्थेचा १८ वा वर्धापन दिन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ल्ड ट्रेंड सेंटर मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल सार्थकचे अभिनंदन केले. सन २०२७ साली फिनलँड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होत असलेल्या दिव्यांग स्पर्धकांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदक, माध्यमकर्मी व सार्थकचे सल्लागार सिद्धार्थ काक, केंद्र शासनाचे माजी सचिव व सार्थकचे सल्लागार लव वर्मा, सार्थकचे संस्थापक डॉ जितेंद्र अगरवाल, वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या संचालिका प्रिया पानसरे, संगीता जैन, दिव्यांग व्यक्ती तसेच नॅशनल ऍबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    03.07.2026: कॉर्पोरेट, शिक्षण संस्था व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी रॊजगार, कौशल्य शिक्षणाच्या अधिक संधी निर्माण कराव्या: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कॉर्पोरेट, शिक्षण संस्था व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी रॊजगार, कौशल्य शिक्षणाच्या अधिक संधी निर्माण कराव्या: राज्यपाल…

    तपशील पहा

    01.07.2026 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली ज्येष्ठ नाट्य निर्मात्या व दिग्दर्शिका विजया…

    तपशील पहा
    01.07.2026:  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १ जुलै) सन २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसह विविध कृषी पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी १८९ शेतकरी, संस्था व गटांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉप वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषीराज्य मंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे आदी या कृषी सन्मान सोहळ्याला उपस्थित होते.

    01.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी सन्मान व पुरस्कार सोहळा संपन्न

    दि. 1 जुलै, 2026 वृत्त क्र. 2393 नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल…

    तपशील पहा
    01.07.2026: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे आज पार पडले. जागतिक वातावरण बदल या विषयावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेखांचे अध्ययन करुन सदर पुस्तक संकलित केले असल्याचे डॉ सावंत यांनी यावेळी सांगितले. या पुस्तकामध्ये हवामान बदलाचा चक्रव्यूह, हवामान बदल आणि मृदा, हवामान बदल आणि जीवघेणे आजार, हवामान बदल आणि अन्नसुरक्षा, कुपोषण आणि हवामान बदल आदी प्रकरणाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

    01.07.2026: राज्यपाल, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

    राज्यपाल, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन हवामान बदलांमुळे एक दिवस…

    तपशील पहा
    01.07.2026: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला  पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे  सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

    01.07.2026 : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन

    माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ११३…

    तपशील पहा