बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    Governor offers tribute to Bhagat Singh, Rajguru and Sukhdev

    23.03.2025: राज्यपालांचे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

    राज्यपालांचे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन शहीद दिनानिमित्त राज्यपाल सी. पी….

    तपशील पहा
    22.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत  महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.   'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून राजभवनातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहकार्याने बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिहारचे राज्यगीत व भोजपुरी गीत सादर केले तसेच मिथिला प्रदेशाचे लोकनृत्य झिझिया व जट-जटिन सादर केले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्यपालांचा सत्कार केला. कार्यक्रमाला राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

    22.03.2025: महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा

    महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख…

    तपशील पहा
    22.03.2025 : क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खासदार आणि चित्रपट अभिनेत्यांच्या एका प्रदर्शनी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी MCA मैदानावर केले. या सामन्यात खासदारांच्या 'नेता इलेव्हन' संघाचे नेतृत्व माजी मंत्री आणि खासदार अनुराग ठाकूर यांनी केले तर चित्रपट अभिनेत्यांच्या संघाचे नेतृत्व सुनील शेट्टी यांनी केले. या सामन्यात खासदार श्रीकांत शिंदे, मोहम्मद अझरुद्दीन, युसूफ पठाण, मनोज तिवारी, चंद्रशेखर, दिनेश शाक्य, गुरमीत सिंह, कमलेश पासवान, निशिकांत दुबे, के सुधाकर, लवू कृष्णा हे खासदार संसद सदस्यांच्या नेता संघाकडून खेळले. तर चित्रपट कलाकार अनुपम खेर, सोहेल खान, जॅकी श्रॉफ, शरद केळकर यांनी अभिनेते इलेव्हनचे प्रतिनिधित्व केले. अभिनेते अर्जुन रामपाल, सोनू सूद व तुषार कपूर हे देखील यावेळी उपस्थित होते.

    22.03.2025 : क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित खासदार – अभिनेते संघातील क्रिकेट सामन्याचे राज्यपालांकडून उद्घाटन

    क्षयरोग हरेल, देश जिंकेल क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित खासदार – अभिनेते संघातील क्रिकेट सामन्याचे राज्यपालांकडून उद्घाटन…

    तपशील पहा
    22.03.2025:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचे राज भवन, मुंबई येथे प्रकाशन संपन्न झाले. ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा  यांनी हा 'हेडगेवार : अ  डेफिनिटिव्ह बायोग्राफी' हा इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथ लिहिला आहे. प्रकाशन सोहळ्याला एशियन पेंट्सचे प्रवर्तक जलज दाणी, आवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल, मोहित डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहित मेहता, लेखक सचिन नंदा, एनएसईचे प्रमुख डॉ आशिषकुमार चौहान, रवींद्र संघवी, समीर कोपीकर, मिलिंद घुमरे आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

    22.03.2025: राज्यपालांच्या हस्ते डॉ हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन संपन्न

    राज्यपालांच्या हस्ते डॉ हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन संपन्न फुटीरतावादी प्रवृत्ती काही राज्यात कार्यरत; डॉ हेडगेवार…

    तपशील पहा
    20.03.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विविध वैयक्तिक, सांघिक तसेच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. एमसीए क्लब बीकेसी मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक तसेच सर्वोच्च समितीचे सदस्य, आजी माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक व प्रशासक उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते एमआयजी क्रिकेट क्लबचे संस्थापक प्रविण बर्वे, प्रशासक प्रा. रत्नाकर शेट्टी व माजी कर्णधार डायना एडलजी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचे चौथे जीवनगौरव पुरस्कार विजेते दिलीप वेंगसरकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी दिवंगत क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांच्या कुटुंबीयांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते २०२३ रणजी चषक विजेत्या संघाचा तसेच वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी चषक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

    20.03.2025: राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान

    राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबई क्रिकेट…

    तपशील पहा
    19.03.2025: राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

    19.03.2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित राज्यपालांच्या हस्ते आदिती तटकरे, उदय सामंत,…

    तपशील पहा
    19.03.2025: राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

    19.03.2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित राज्यपालांच्या हस्ते आदिती तटकरे, उदय सामंत,…

    तपशील पहा
    19.03.2025:  Governor welcomes NZ PM Christopher Luxon at Raj Bhavan

    19.03.2025: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत

    न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत न्यूझीलंड पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व सुशासनासाठी ओळखला जाणारा देश राजभवन येथील…

    तपशील पहा
    19.03.2025:  Governor welcomes NZ PM Christopher Luxon at Raj Bhavan

    19.03.2025: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत

    न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत राजभवन येथील स्नेहभोजनाला क्रिकेटपटू एजाज पटेल उपस्थित राज्यपाल सी. पी….

    तपशील पहा
    राज्यपालांकडून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचा आढावा

    17.03.2025 : राज्यपालांकडून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचा आढावा

    राज्यपालांकडून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचा आढावा राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी सोमवारी…

    तपशील पहा
    16.03.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत इफ्तार सोबत 'सहिष्णुता व सहअस्तित्व' या विषयावर एका सर्वधर्म परिसंवाद संपन्न

    16.03.2025: संयुक्त अरब अमिराती दूतावासातर्फे आयोजित रमझान इफ्तार राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    संयुक्त अरब अमिराती दूतावासातर्फे आयोजित रमझान इफ्तार राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न मानवता टिकवून ठेवायची असेल तर…

    तपशील पहा
    15.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रसिद्ध फुटबॉलपटू पद्मश्री आय. एम. विजयन यांचा त्रिशूर येथे सत्कार करण्यात आला. द चेंबर ऑफ कॉमर्स, त्रिशूरच्या वतीने या सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला त्रिशूरचे महापौर एम. के. वर्गीस, त्रिशूरचे आमदार पी. बालचंद्रन, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक टी. एस. पट्टाभिरामन, चेंबरचे उपाध्यक्ष एम. आर. फ्रान्सिस आणि चेंबरचे सचिव सोली थॉमस (जॉन कवलक्कट) यांच्यासह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

    15.03.2025: राज्यपालांच्या हस्ते फुटबॉलपटू आय एम विजयन यांचा सत्कार

    राज्यपालांच्या हस्ते फुटबॉलपटू आय एम विजयन यांचा सत्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते…

    तपशील पहा