बंद

    प्रसिद्धीपत्रक

    21.06.2026:  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबईत सात दिवसांपासून सुरु असलेला लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपटांचा १९ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF २०२६) संपन्न झाला.  यावेळी राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील उत्कृष्ट ऍनिमेशन फिल्म, उत्कृष्ट लघुपट (कथात्मक) व उत्कृष्ट माहितीपट  पुरस्कार  प्रदान करण्यात आले.  ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील बेस्ट साउंड, बेस्ट एडिटर व बेस्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव प्रभात कुमार, मंत्रालयातील अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार दीपक नारायण, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी तसेच राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.

    21.06.2026: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा: राज्यपालांचे…

    तपशील पहा
    Governor joined the senior officers of Indian Coast Guard in performing yoga in Lok Bhavan

    21.06.2026: आंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास

    आंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास विद्यापीठांनी जगासाठी…

    तपशील पहा
    महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

    20.06.2026 : महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

    महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द…

    तपशील पहा
    20.06.2026 : राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कुलबस

    20.06.2026 : राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कुलबस

    राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कुलबस सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रायगड जिल्ह्यातील रातवड येथील…

    तपशील पहा
    17.06.2026: विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांच्या अनौपचारिक परिषदेचे उदघाटन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत बॉम्बे जिमखाना येथे संपन्न झाले.  'गेट वे हाऊस' या संस्थेमार्फत वाणिज्यदूतांच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यामध्ये  वाणिज्यदूतांची   भूमिका महत्त्वाची भूमिका असून महाराष्ट्रासोबत व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यामध्ये मुंबईस्थित वाणिज्यदूत महत्वाचे योगदान देतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.  'गेट वे हाऊस'च्या कार्यकारी संचालक मनजित कृपलानी यांनी प्रास्ताविक केले, तर एझेडबीचे सहसंस्थापक बेहराम वकील यांनी आभार प्रदर्शन केले.

    17.06.2026: विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण -राज्यपाल

    विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण -राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई, दि….

    तपशील पहा
    राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

    17.06.2026 : राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

    राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा…

    तपशील पहा
    15.06.206: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांचा नव्या शैक्षणिक सत्रातील प्रवेशोत्सव समारंभ आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्यपालांनी शाळेतील प्रवेशाच्या प्रक्रियेचे अवलोकन करुन खगोलशास्त्र प्रयोगशाळा, पूर्व-प्राथमिक (बालवाडी) वर्ग, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, एफएलएन प्रयोगशाळा आदींची यावेळी पाहणी केली. राज्यपालांच्या हस्ते मुलांना शालेय वस्तूंचे तसेच मध्यान्ह भोजनाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्त अश्विनी भिडे, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शिक्षण) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे (MPSP) राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती यांच्यासह शिक्षक, पालक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

    15.06.2026: विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे – राज्यपाल

    शाळा प्रवेशोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे – राज्यपाल…

    तपशील पहा
    12.06.2026:  महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने माजी खासदार आणि असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची आज लोक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांसाठी युवकांना योग्य प्रशिक्षण मिळण्याबाबत चर्चा झाली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील खेळाडुंमध्ये गुणवत्ता आहे, तथापि तेथील पायाभूत सुविधांच्या तुलनेत महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्राने तेथील गुणवान खेळाडुंना महाराष्ट्रात आणून प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यावे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानांतर्गत इतर राज्यांमध्ये विविध खेळांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, सहसचिव डॉ. प्रदीप खांडरे, ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे महासचिव सुंदर अय्यर, त्रिपुरा ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव तसेच ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुजित रॉय यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहे.

    12.06.2026: महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट

    महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट मुंबई, दि. १२…

    तपशील पहा