20.06.2026 : राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कुलबस
राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कुलबस
सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रायगड जिल्ह्यातील रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस देण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शनिवारी (दि. २०) ही स्कुलबस लोकभवन येथे शिक्षण संस्थेला विधिवत देण्यात आली.
कार्यक्रमाला सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टचे विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समितीचे पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे मानद सचिव डॉ निलेश रेवगडे, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील रातवड येथील शाळा आठ गावांमधील तसेच ४ आदिवासी पाड्यांमधील १९६ मुलामुलींना शिक्षण देत असून स्कुलबस सेवेमुळे शाळेतील पटसंख्या ४२ विद्यार्थ्यांनी वाढली असल्याचे सांगण्यात आले. सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे आजवर ९ स्कुलबस देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रमेश तुलसियानी व सुमन तुलसियानी यांचे १५ दिवसांच्या अंतरानी अलीकडेच निधन झाले. परंतु त्यांच्या ट्रस्टतर्फे आजही सेवाकार्य सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*****
राज्यपाल के हस्ते रायगढ़ जिले के आदिवासी विद्यार्थियों के लिए स्कूल बस समर्पित
महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्माने शनिवार (20 जून) को महाराष्ट्र लोकभवन में रायगढ़ जिले के आदिवासी एवं ग्रामीण विद्यार्थियों के लिए एक स्कूल बस शिक्षा संस्था को विधिवत समर्पित की।
यह स्कूल बस सुमन रमेश तुलसियानी ट्रस्ट द्वारा रायगढ़ जिले के रातवड स्थित छत्रपति शिक्षण मंडल के माध्यमिक विद्यामंदिर को प्रदान की गई है।
इस अवसर पर ट्रस्ट के विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समिती के पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडल, कल्याण के मानद सचिव डॉ. निलेश रेवगडे तथा संस्था के अन्य पदाधिकारी उपस्थित थे।
बताया गया कि रातवड स्थित यह विद्यालय आठ गांवों तथा चार आदिवासी पाड़ों के 196 विद्यार्थियों को शिक्षा प्रदान करता है। स्कूल बस सेवा शुरू होने के बाद विद्यालय में 42 विद्यार्थियों की अतिरिक्त वृद्धि हुई है।
सुमन रमेश तुलसियानी ट्रस्ट द्वारा अब तक कुल नौ स्कूल बसें प्रदान की जा चुकी हैं। इस अवसर पर यह भी बताया गया कि रमेश तुलसियानी और सुमन तुलसियानी का हाल ही में पंद्रह दिनों के अंतराल में निधन हो गया था। इसके बावजूद उनके ट्रस्ट के माध्यम से समाजसेवा का कार्य निरंतर जारी है।