बंद

    डॉ. शंकर दयाळ शर्मा (03.04.1986 – 02.09.1987)

    डॉ. शंकर दयाळ शर्मा

    डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 3 एप्रिल 1986 रोजी पदग्रहण केले. डॉ.शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म दि. 19 ऑगस्ट 1918 रोजी भोपाळ येथे श्री. खुशीलाल शर्मा आणि श्रीमती सुभद्रा शर्मा यांच्या पोटी झाला. दि. 7 मे 1950 रोजी श्रीमती विमला शर्मा (विमलाजी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली अशी अपत्य प्राप्ती झाली. एका मुलीचा 1985 मध्ये मृत्यू झाला.

    डॉ.शंकर दयाळ शर्मा यांनी सेंट जॉर्ज कॉलेज, आग्रा, अलाहाबाद विद्यापीठ, लखनऊ विद्यापीठ, फिट्झविल्यम कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ, हार्वर्ड लॉ स्कूल, झ्यूरीच विद्यापीठ, पॅरिस विद्यापीठ, लंडन विद्यापीठ आणि लिंकन इन ( कायदा विद्यालय ) येथे शिक्षण घेतले.

    त्यांनी इंग्रजी वाङमय, हिंदी आणि संस्कृत या विषयांमध्ये एम.ए. ची पदवी घेतली आणि विद्यापीठातून पहिले आले. त्यांनी आपली एल.एल.एम. ची पदवी लखनऊ विद्यापीठातून मिळविली आणि पुन्हा एकदा विद्यापीठातून पहिले आले. त्यांनी पी.एच.डी. केंब्रिज विद्यापीठातून केली आणि लंडन विद्यापीठाकडून त्यांना “लोकप्रशासनातील पदविकेद्वारे सन्मानित करण्यात आले. डॉ.शर्मा यांनी नऊ वर्षे लखनऊ विद्यापीठात आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात ( 1946 ते 1947) कायदा हा विषय शिकवला लिंकन इन मधून (कायदा विद्यालयातून) त्यांनी बार-अक्ट-लॉ (बॅरिस्टरची पदवी घेतली) नंतर ते हार्वर्ड लॉ स्कूलचे ( 1947-1948) सन्मान्य सदस्य बनले.

    डॉ.शर्मा यांना सामाजिक सेवेसाठी लखनऊ विद्यापीठाने `चक्रवर्ती सुवर्ण पदक` देऊन सन्मानित केले होते. विक्रम विद्यापीठ आणि भोपाळ विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांनी त्यांना एलएल.डी (सन्मान्य कारणाने) ही पदवी प्रदान केली. ते सागर विद्यापीठाचे प्रतिकुलपती (1956-59) देखील होते.

    विशेष आवडीची क्षेत्रे :

    परराष्ट्र व्यवहार; ग्रामीण विकास; विधि; तत्त्वज्ञान, धर्म व शिक्षण यांचा तौलनिक अभ्यास.

    क्रीडा:

    डॉ.शर्मा त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय कारकीर्दी दरम्यान, त्यांनी व्यायामाचे खेळ, नौकानयन आणि पोहणे या क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करून, क्रीडापटू म्हणून विशेष प्राविण्यही प्राप्त केले.

    आवडता विरंगुळा व मनोरंजन:

    राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हितसंबंधांवरील विविध विषयांवर वाचन करणे आणि लिहिणे आणि भाषा, इतिहास, कला व संस्कृती, तौलनिक, धर्म, तत्त्वज्ञान, काव्य, वाङमय आणि भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चिमात्य संगीत यांचा अभ्यास.

    कारकीर्द:

    डॉ.शर्मा यांनी 1940 मध्ये लखनऊ येथे आपल्या वकिलीच्या व्यवसायास सुरूवात केली. मुरब्बी स्वातंत्र्य सैनिक असलेल्या डॉ.शर्मा यांनी स्वातंत्र्य संग्राम, भोपाळ मधील विलिनीकरण चळवळ आणि त्यानंतर 1978 मध्ये कारावास भोगला. ते भूतपूर्व भोपाळ राज्याचे मुख्यमंत्री (एप्रिल 1952 ते नोव्हेंबर 1956) होते. मध्य प्रदेश सरकार मध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण, विधि, सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य, राष्ट्रीय संसाधने आणि स्वतंत्र महसूल या विभागांचा कार्यभार सांभाळला (1950-1967) आणि त्यानंतर ते केंद्रीय दूरसंचार मंत्री (10 ऑक्टोबर 1974 ते 24 मार्च 1977) होते. ते, आंध्र प्रदेशाचे (29 ऑगस्ट 1984 ते 25 डिसेंबर 1985) आणि पंजाबचे राज्यपाल (26 नोव्हेंबर 1985 ते 2 एप्रिल 1986) होते.

    सार्वजनिक आयुष्य:

    डॉ.शर्मा, भोपाळ काँग्रेस समितीचे (1950-1952) अध्यक्ष; 32 वर्षांपेक्षा जास्त काळ अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य (1952-1984); मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष (1967-1968); जवळपास 20 वर्षे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य; भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस (1968-1972) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष (1972-1974) होते. कायदेमंडळाचा सभासद आणि संसदपटू म्हणून त्यांना 30 वर्षांहून अधिक काळ एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. ते राज्य विधानमंडळाचे सदस्य (1952-1971)होते आणि त्यानंतर संसदेचे सदस्य (पाचवी लोकसभा : 1971-1977 आणि सातवी लोकसभा: जानेवारी 1980 ते ऑगस्ट 1984) होते.

    वाङमयीन आणि पत्रकारीय कर्तृत्वावर दृष्टिक्षेप:

    अ. प्रकाशने

    1. परराष्ट्र व्यवहारांकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन
    2. क्रांती दृष्ट
    3. इंडो – रशियन संबंध
    4. कायद्याचे राज्य आणि पोलिसांची भूमिका

    ब. संपादकीय कामगिरी

    1. लखनऊ विधि पत्रिका (1941-1943)
    2. लाईट अन्ड लर्निंग (1942-1943)
    3. ईल्म – ओ – नूर (ऊर्दू)
    4. ज्योति (हिंदी)
    5. समाजवादी भारत (1971-1974)

    क. लेख
    त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मोठ्या प्रमाणावर लेख लिहिले आहेत.

    ङ भाषणे
    मद्रास विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांत त्यांनी दीक्षांत भाषणे केली आहेत, तसेच राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद येथे दुसरे सरदार पटेल स्मृती वार्षिक व्याख्यान दिले आहे.

    विदेश प्रवास:

    ते जगभरात खूप फिरले आहेत आणि अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यात पुढील देशांचा समावेश आहे – अफगाणिस्तान, ऑस्ट्रीया, बांग्लादेश, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, चीन, डेन्मार्क, इजिप्त, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, फिनलँड, फान्स, ग्रीस, हाँगकाँग, हॉलंड, हंगेरी, इराक, इटली, जपान, केनिया, कोरीआ, कुवेत, लक्झेंबर्ग, मलेशिया, मॉरिशस, नॉर्वे, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण येमेन, स्वीडन, स्विझर्लंड, थायलंड, इंग्लंड, अमेरिका, रशिया.

    कायमचा पत्ता:

    ई 2/66, अरेरा कॉलनी, भोपाळ, मध्य प्रदेश.