20.10.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रवाना
20.10.2023 : राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुपवाड़ा, जम्मू - काश्मीर येथे स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा राजभवन मुंबई येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रतिमापूजन व रथपूजन करण्यात आले. 'आम्ही पुणेकर फाउंडेशन' व 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती' यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवारा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटच्या सहकार्याने भारत - पाकिस्तान सीमेवर उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, 'आम्ही पुणेकर फाउंडेशन'चे विश्वस्त अभयसिंह राजे शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.
20.10.2023 : Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Chief Minister Eknath Shinde and Minister of Cultural Affairs Sudhir Mungantiwar flagged off the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj from Raj Bhavan Mumbai. The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be presented to the Maratha Light Infantry Regiment for its installation on the India - Pakistan border at Kupwara in Jammu and Kashmir. This statue has been created at the instance of 'Aamhi Punekar Foundation' and 'Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti'.Principal Secretary, Cultural Affairs Department Vikas Kharge, Trustee of 'Aamhi Punekar Foundation' Abhay Singh Raje Shirole, President Hemant Jadhav and other invitees were present.