बंद

    वि‍कास मंडळ विभाग

    संविधानाच्या अनुच्छेद ३७२(२) अन्वये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेवर विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र प्रदेशांसाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करण्यासाठीची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. अशा प्रत्येक विकास मंडळाच्या क्षेत्राच्या संदर्भात अनुच्छेद ३७२(२) च्या उप-खंड (बी) आणि (सी) मध्ये निर्देशित केलेल्या विशिष्ट बाबींसाठी ही जबाबदारी आहे. राज्यपालांचे उपसचिव (वि.मं.) हे महाराष्ट्रातील सर्व विकास मंडळांच्या कामावर देखरेख ठेवत आहेत.