बंद

    24.10.2021: राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: October 25, 2021

    राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना उल्लेखनीय समाज सेवेसाठी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान प्रामुख्याने उपस्थित होते.

    सनदी लेखापाल विजयशरद बालसुंदरम, वॉकहार्ड फाउंडेशनचे डॉ हुजेफा खोराकीवाला, अभिनेत्री पायल घोष, डॉ इंदर मौर्य, मिकी कुमार, बांधकाम व्यावसायी विनोद भोईर, रूपवती गोपाल नायडू, दीप्ती नागरेचा, सौम्या शेट्टी, तरुण तांडेल, आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.