बंद

    23.11.2020 : तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना दुःख

    प्रकाशित तारीख: November 24, 2020

    तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना दुःख

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    श्री तरुण गोगोई हे आसामचे यशस्वी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते होते. मुख्यमंत्री पदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आसामच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे आसामने तसेच देशाने एक अनुभव संपन्न व अभ्यासू नेता गमावला आहे. श्री गोगोई यांना श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.