रामायण अध्ययन प्रेरणादायी: राज्यपाल
अंतिम दिनांक:31.12.2019
रामायण अध्ययन प्रेरणादायी: राज्यपाल
मुंबई, दि. 28 : रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते. रामायण अध्ययन प्रेरणादायी असून त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करु शकतो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले.
मुंबई विद्यापीठ आणि भागवत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कालिना विद्यापीठ परिसर येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भागवत कथाकार रमेश भाई ओझा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, उपकुलगुरु डॉ.रविंद्र कुलकर्णी, दिपक मुकादम, जपानच्या हिन्दी भाषा अभ्यासक श्रीमती डॉ.तोमोको किकुची तसेच अन्य देशातील आणि महाविद्यालयातील हिन्दी भाषेतील तज्ञ उपस्थीत होते.
नानकदेव तसेच अन्य संतांनीही आपापल्या वाड्मयात रामायणाचा उल्लेख केला आहे. आज रामायणाचा अंगीकार सर्व देश करत आहे. सर्वांनी उत्तम गुणांचा अंगिकार केल्यास, समाज निश्चितपणे रामराज्याकड़े वाटचाल करील, असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.