बंद

    राज्यपालांचे शिवाजी महाराज स्मृतीस्थळाला अभिवादन; लालबागच्या राजाचे घेतले दर्शन

    प्रकाशित तारीख: September 6, 2019

    गुरुवारी संध्याकाळी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आज कामकाजाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला भेट देऊन महाराजांच्या स्मृतीला अभिवादन केले.

    राज्यपालांनी लालबाग येथील गणेश मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे देखील दर्शन घेतले.