बंद

  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार राजभवनाच्या नव्या दरबार हॉलची पायाभरणी

  प्रकाशित तारीख: December 19, 2018

  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार राजभवनाच्या नव्या दरबार हॉलची पायाभरणी

  राज्यपाल-सचिवालय इमारतीचे देखील होणार भूमिपूजन

  राजभवन येथे नव्या दरबार हॉलचे भूमिपूजन तसेच पायाभरणी समारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२०) सकाळी १०.१५ वाजता होणार आहे. राज्यपाल-सचिवालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा देखील यावेळी शुभारंभ होणार आहे.

  वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

  नव्या दरबार हॉलची क्षमता एकंदर ९०० आसनांची असेल. जुन्या दरबार हॉलची क्षमता २५० इतकी होती. नवा दरबार हॉल तसेच राज्यपाल सचिवालय इमारत ३१ जानेवारी २०२० पर्यन्त बांधून पूर्ण होईल असे सा.बां. विभागाने कळविले आहे.