बंद

  श्री. सादिक अली (30.04.1977 – 03.11.1980)

  श्री. सादिक अली श्री. सादिक अली यांचा जन्म ४ एप्रिल, १९१० रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे झाला. अलाहाबाद विद्यापीठातील शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी लहान वयातच घर सोडले. त्यानंतर ते स्वातंत्र्युद्धात सहभागी झाले. अनेकवेळा त्यांनी तुरूंगवासही भोगला.

  १९३६ ते १९४८ या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कार्यालयीन सचिव आणि मग स्थायी सचिवही झाले. १९५८-१८६२ व पुन्हा १९६४-१९६९ या कालावधीमध्ये ते प्रमुख कार्यवाह होते. १९५० ते १९५२ पर्यंत ते तात्पुरत्या संसदेचे आणि १९५७ पासून ते १९७० पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तसेच १९५८-६२ आणि १९६४-६९ या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या `आर्थिक पुनर्विलोकन` (इकॉनॉमिक रिव्ह्यू) याचे मुख्य संपादकही होते.

  १९७१-७३ या काळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले, १९७७-८० या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते, तर १९८०-८२ या काळात तामिळनाडूचे राज्यपाल होते. १९९२-९६ या कालावधीत त्यांनी राजघाट समाधी समिती, नवी दिल्ली याचे अध्यक्ष म्हणून काम केले.

  १९८५ पासून ते गांधी स्मारक संग्रहालय समितीचे अध्यक्ष होते, आणि १९९० पासून गांधी राष्ट्रीय स्मारक निधीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट आणि सांप्रदायिक सद्भावना परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

  ए सर्व्हे टूवर्डस सोशालिस्ट थिंकिंग इन द काँग्रेस, डेमोक्रेसी अँड नॅशनल इंटिग्रेशन, दि व्हिजन ऑफ स्वराज्य इ. त्यांची पुस्तके खूपच गाजली होती.