बंद

  श्री.एस्.एम्.कृष्णा (06.12.2004 – 08.03.2008)

  श्री. सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णाश्री. सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा (एस्. एम्. कृष्णा) यांचा जन्म १ मे १९३२ रोजी झाला. सन १९९९ ते २००४ या कालावधीत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. येथील महाराजा महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी शासकीय विधि महाविद्यालय, बंगलोर येथून कायद्याची पदवी संपादन केली. त्यांनी सदर्न मॅथोडिस युनिव्हर्सिटी, डल्लास (टेक्सास), अमेरिका आणि त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी येथून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.

  भारतात परतल्यानंतर कृष्णा यांनी काही काळ रेणूकाचार्य विधी महाविद्यालय, बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. श्री. कृष्णा हे, कर्नाटक विधानसभेत १९६२ मध्ये निवडून गेले. त्यांनी १९६८ साली मंडया मतदारसंघातून संसदेत प्रथमत: पदार्पण करून ते चौथ्या लोकसभेचे सदस्य बनले. ते पाचव्या लोकसभेवर सुद्धा निवडून गेले होते, परंतु त्यांनी १९७२ मध्ये राज्याच्या राजकारणात परत येणे पसंत केले. ते कर्नाटक विधान परिषदेवर निवडून गेले आणि ९७२ ते १९७७ या कालावधीत वाणिज्य, उद्योग व संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले. सन १९८० मध्ये ते पुन्हा लोकसभेत परतले आणि १९८३-८४ मध्ये उद्योग राज्यमंत्री व १९८४-८५ मध्ये वित्त राज्यमंत्री बनले.

  श्री. कृष्णा हे १९८९ मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष बनले. हे पद त्यांनी१९९२ पर्यंत धारण केले. १९९२ मध्ये ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. १९९६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले व ऑक्टोबर १९९९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

  ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ पर्यंत श्री.कृष्णा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. श्री. कृष्णा यांनी ६ डिसेंबर २००४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथग्रहण केली.

  श्री. कृष्णा यांनी अनेक देशांमध्ये विपुल प्रवास केला असून ते १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय प्रतिनिधी मंडळातील एक सदस्य होते. ते १९९०मध्ये वेस्टमिन्स्टर, इंग्लंड येथे झालेल्या राष्ट्रकुल संसदीय चर्चासत्रात एक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. दिनांक ८ मार्च २००८ पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्रातून गेल्यावर ते राज्यसभेवर निवडून गेले. सन २००९ ते २०१२ या काळात ते भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते.

  श्री. एस्. एम्. कृष्णा यांचा संक्षिप्त परिचय:

  • शैक्षणिक अर्हता: बी.ए.बी.एल, एम.सी.एल (टेक्सास)
  • व्यक्तिगत माहिती: दिवंगत श्री. एस्. सी. मल्ला यांचे सुपुत्र. तालुका मद्दुर, जि.मंड्या
  • शिक्षण: महाराजा महाविद्यालय, म्हैसूर, शासकीय विधी महाविद्यालय, बंगलोर, सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी, डल्लास,टेक्सास, (अमेरिका), बुध्दिमान व व्यासंगी असलेला पदवीधर विद्यार्थी,जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, वॉशिग्टन बी.सी. (अमेरिका).
  • वैवाहिक स्थिती: श्रीमती प्रेमा यांचेरोबर दि.२९ एप्रिल १९६४ रोजी विवाह अपत्य-मुली
  • धारण केलेली पदे:
  • शैक्षणिक: श्री. जगद्गुरू रेणुकाचार्य विधि महाविद्यालय, बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक (१९६२ ते ६८)
  • व्यावसायिक: न्यायवादी (अ‍ॅटर्नी-अ‍ॅट-लॉ)
  • राजकीय वाटचाल:
   • प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्वीचे सदस्य
   • तिसऱ्या कर्नाटक विधानसभेचे सदस्य, १९६२ ते ६७
   • भारतीय राष्ट्रकुल संसदीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य,
   • संसदीय परिषद, न्युझिलंड, १९६५
   • चौथ्या लोकसभेचे सदस्य, १९६८-७०
   • पाचव्या लोकसभेचे सदस्य, १९७१-७२
   • कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य, १९७२-७७
   • वाणिज्य, उद्योग व संसदीय कार्यमंत्री, कर्नाटक शासन १९७२-७७
   • संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय प्रतिनिधी मंडळातील सदस्य,१९८२
   • केंद्रीय उद्योग राज्यमंत्री, १९८३-८४
   • केंद्रीय वित्त राज्यमंत्री, १९८४-८५
   • नवव्या कर्नाटक विधानसभेचे सदस्य, १९८९-९४
   • कर्नाटक विधानसभा अध्यक्ष, १९८९-९२
   • वेस्ट मिन्स्टर, इंग्लंड येथे मार्च १९९० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल संसदीय चर्चासत्रातील एक प्रतिनिधी
   • कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, १९९२-९४
   • राज्यसभा सदस्य, एप्रिल १९९६ ते ऑक्टोबर १९९९
   • कर्नाटकचे मुख्यमंत्री, ११ ऑक्टोबर १९९९ ते २० मे २००४
   • कर्नाटक प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष, फेब्रुवारी १९९९ ते जून २०००
   • महाराष्ट्राचे राज्यपाल, ६ डिसेंबर २००४ पासून ८ मार्च २००८
  • सामाजिक कार्ये: वर्ल्ड युनिव्हर्सिटी सर्व्हिस यांच्याशी संबंधित
  • आवडता छंद: ड्रेस डिझायनिंग व वाचन
  • खेळ: टेनिस, योग