बेणे ईझ्रायली ज्यू समाजाचे दुसरे सर्वाधिक जुने प्रार्थनास्थळ
बेणे ईझ्रायली ज्यू समाजाचे दुसरे सर्वाधिक जुने प्रार्थनास्थळ
मुंबईतील शारे रासोन सिनेगॉग १७५ वर्षांचे झाले !
बेणे इझ्रायली ज्यू समाजाचे मुंबईतील दुसरे जुने सिनेगॉग असलेले पायधुनी, मांडवी शारे रासोन सिनेगॉग १७५ वर्षांचे झाले असून या निमित्त जे जे रोड, भायखळा येथील मागन डेव्हिड सिनेगॉग येथे रविवारी (दि.१३) सायंकाळी ५.३० वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
कार्यक्रमाला इझ्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकेलस्टाईन, धर्मगुरू (रबाय) याकोब मेनाशे, धर्मगुरू रोमिएल डॅनियल, सॉलोमन सॉफर, शारे रासोन सिनेगॉगचे अध्यक्ष जुडा सॅम्युएल, व्यवस्थापिका सिनोरा कोलटकर व देशविदेशातील निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. शारे रासोन सिनेगॉगची स्थापना सन १८४३ साली झाल्याचे त्यांनी संगितले. (Judah Samuel 9819619919)