बंद

    उपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ

    प्रकाशित तारीख: November 17, 2018

    तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासोबत मलबार हिल येथील राजभवन परिसराचा फेरफटका मारला तसेच येथील महत्वाच्या स्थळांची पाहणी केली.

    सुरवातीला व्यंकय्या नायडू यांनी राज्यापालांसोबत भूमिगत बंकरला भेट दिली. त्यानंतर समुद्रकिनारी असलेल्या सूर्योदय गॅलरी येथून उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले. अलिकडेच जमिनीखालून बाहेर काढलेल्या दोन ब्रिटीशकालीन भव्य तोफांची देखील नायडू यांनी पाहणी केली. त्यानंतर राजभवन परिसरात महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा शासकीय सोहळा झाला होता, त्या ऐतिहासिक स्थळाला उभयतांनी भेट दिली. याठिकाणी राजभवन पाहण्यासाठी आलेल्या अभ्यागतांसोबत देखील उपराष्ट्रपतींनी संवाद साधला.