एअर चिफ मार्शल (निवृत्त) इद्रिस हसन लतिफ (परम विशिष्ट सेवापदक ) (06.03.1982 – 16.04.1985)
एअर चिफ मार्शल इद्रिस हसन लतिफ यांची 1 सप्टेंबर, 1978 पासून हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती आणि जवळजवळ 40 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर भारतीय हवाई दलामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी हे पद सोडले. हवाई दलाच्या उड्डाण शाखेतील (फ्लाईंग ब्रँच) एक अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाल हा विविध स्तरावरील जबाबदाऱ्यांनी व्यापलेला एक विस्तृत असा पटच आहे. त्यांनी दुसरे महायुद्ध पूर्वकालीन व्हिंटेज बाय प्लेन्स ते सुपरसॉनिक मिग विमाने आणि भारतीय बनावटीची मरुत विमाने अशी वेगवेगळी लढाऊ, बॉम्बवर्षाव करणारी तसेच वाहतूक करणारी अनेक विमाने हजारो तास चालविली आहेत.
9 जून, 1923 रोजी जन्म झालेल्या श्री.इद्रिस यांची 1942 साली हवाई दलात सेवा सुरू झाली. त्यावेळी ते 18 वर्षांचे होते आणि हैद्राबाद येथील निझाम महाविद्यालयात शिकत होते. हवाई दल प्रमुखांचे वडील श्री.हसन लतिफ हे हैद्राबाद राज्याचे मुख्य अभियंता होते आणि त्यांच्या निवृत्तीनंतर ते उस्मानिया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले.
अंबाला येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांची पाणबुडी-विरोधी (अँटि सबमरीनची) कार्ये पार पाडण्यासाठी कराची येथील कोस्टल फ्लाईटसाठी नेमणूक झाली. भारतीय हवाई दलात त्यावेळी लवकरच समाविष्ट होणाऱ्या हरिरकेन आणि स्पिटफायर या लढाऊ विमांनाच्या प्रशिक्षणासाठी 1943 मध्ये प्रथमच ज्या काही निवडक वैमानिकांना इंग्लंडमध्ये पाठवणार होते त्या वैमानिकांमध्ये यांचा समावेश होता.
एअर चिफ मार्शल लतिफ यांना युद्धाचा पहिला अनुभव आला तो, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी. अराकत फ्रंटवरील बर्मा मोहिमेमध्ये जेव्हा त्यांनी हरिरकेन स्कवाड्रन मधील ग्राऊंड ॲटॅक वैमानिक म्हणून सहभाग घेतला होता, तेव्हा. त्या आधी 1943-44 मध्ये रॉयल एअर फोर्स मधून त्यांनी युनायटेड किंगडम मध्ये उड्डाण केले होते. युध्दानंतर लगेचच क्रमांक 9 च्या लढाऊ विमानांच्या तुकडीबरोबर (स्कवाड्रन) ते बर्मामध्ये परतले. सध्या हीच तुकडी सेब्बर किलर नॅट्स या प्रसिद्ध विमानांचे उड्डाण करीत आहे. एअर मार्शल हे तिचे कमांडोर कमांडंट असल्याचा तिला आजही अभिमान आहे.
वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी ते स्कवाड्रन लिडर होते, जेव्हा स्वातंत्र्याच्या उद्याच्या वेळी टेम्पेस्ट फायटर्स या लढाऊ विमानांनी सुसज्जता असलेल्या क्रमांक 4 तुकडीचे ते प्रमुख होते. विमान चालविण्याच्या त्यांच्या या समृद्ध अनुभवाला मान्यता देण्यासाठी या त्यांच्या प्राविण्यामुळे त्यांना आणखी एक सन्मान प्रदान करण्यात आला. आपल्या सल्लागार गटाचा एक सदस्य म्हणून त्यांना इंडोनेशियामध्ये एका विशेष मोहिमेवर पाठवण्यात आले. या गटाने इंडोनेशिया हवाई दलात जेट लढाऊ विमानांचा प्रवेश करण्यास मदत केली.
संरक्षण सेवा अधिकारी महाविद्यालय (डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेज) आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचा (नॅशनल डिफेन्स कॉलेज) एक पदवीधर म्हणून, एअर चिफ मार्शल लतिफ यांनी ईस्टर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि वरिष्ठ एअर स्टाफ अधिकारी म्हणून सेवा बजावली. 1971 च्या कारवाईच्या वेळी, ते एअर स्टाफ (योजना)चे सहायक प्रमुख होते आणि त्या पदाच्या नात्याने, त्यांनी आघाडीवरील तुकड्यांच्या समस्यांचे आणि कामगिरीचे प्रत्यक्ष मूल्यमापन करण्याची आणि हवाई दलाचे आधुनिकीकरण करणाऱ्या योजना तयार करण्याची कठीण जबाबदारी पार पाडली.
जवळजवळ पाच वर्षे (1961-1965) ते वॉशिग्टंन मधील आपले हवाई राजदूत सहायक होते आणि त्याच वेळी कॅनडाला देखील त्यांना पाठविले होते. त्यांच्या याच पदावधीत, त्यांनी युएसएएफ,एफ-एस ही लढाऊ विमाने चालविली.
जानेवारी 1974 मध्ये एअर मार्शलच्या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली, हवाई दल मुख्यालयात एअर ऑफिसर इन चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ, सेंट्रल एअर कमांड आणि त्यानंतर मेंटेंनस कमांड म्हणून कार्यभार स्वीकारला.
मे 1977 मध्ये त्यांची वाईस चिफ ऑफ एअर स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली, एअर स्टाफ प्रमुख म्हणून पद ग्रहण करीपर्यंत ते त्या पदावर होते. त्यांच्या या अत्यंत असाधारण अशा या उल्लेखनीय सेवेचा गौरव म्हणून, एअर चिफ मार्शल लतिफ यांना 1971 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
एअर चिफ मार्शल लतिफ यांचे हे शक्तिशाली व्यक्तिमत्व म्हणजे असाधारण युध्दविषयक कामगिरी बजावणाऱ्या आणि त्याचबरोबर मनुष्यहितासाठी झटणाऱ्या अशा गुणांचा अद्भूत असा मिलाफ आहे. त्यांच्या कारकीर्दीतील एक संस्मरणीय अशी विशेष घटना म्हणजे 1975 मधील पटना पुराच्या वेळी त्यांच्या नेतृत्वाखाली, हवाई दलाने केलेली कामगिरी. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली व निदेशांनुसार हेलिकॉप्टर वैमानिक एका दिवसात 20 उड्डाणे करू शकले. पूरग्रस्तांची सुटका करण्याचे मानवतेचे कार्य पार पाडण्यासाठी नेमकेपणा व अचूकता आणि उच्च प्रतीचे उड्डाण कौशल्य आवश्यक होते. उपलब्ध असलेल्या सर्व हवाई आणि जमिनीवरील (ग्राऊंड) कर्मचारीवर्ग त्या कामगिरीत सहभागी झाला होता. या कामगिरीत उद्ध्वस्त करणाऱ्या पुरातून वाचवलेल्या लोकांची कृतज्ञता त्यांनी कमवली.
विमान चालविणे हे एअर चिफ मार्शल लतिफ यांचे कायमचे पहिले प्रेम (वेड) होते आणि हवाई दलात त्यांना मोठ्या पदावर बढत्या मिळाल्यानंतरा त्यांच्या इतर कठीण जबाबदाऱ्या सांभाळून, त्यांनी विमान चालविण्यासाठी नेहमीच जास्तीतजास्त वेळ काढला. हवाई दलातील त्यांच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत विमान चालविण्याचा त्यांचा हा आनंद कायम राहिला आणि अलिकडच्या काही महिन्यात, त्यांनी हवाई दलात नव्याने समाविष्ट झालेली जॅग्वार, मिग-23 आणि मिग-25 ही अत्याधुनिक विमानेही चालवून पाहिली. 1981 मध्ये त्यांनी फ्रान्सला अधिकृत भेट दिली असताना त्यांना मिराज 2000 हे विमान चालवण्याचीही संधी लाभली.
हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतरच्या काही दिवसातच, शासनाने, पुनर्रचित सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचा (पब्लिक एंटरप्रायझेस सिलेक्शन बोर्डचा) एक सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची घोषणाही केली.
एअर चिफ मार्शल लतिफ यांचे महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता यांच्याबरोबरही दीर्घकाळ व घनिष्ट संबंध राहिले आहेत. त्यांचे पूर्वज मुंबईत आले आणि स्थायिक झाले आणि त्यांच्या कुटुंबाचे जुने घर `लतिफिया` पंडीता रमाबाई मार्गावर असून मुंबईतील त्यांची मालमत्ता चौपाटीपर्यंत पसरलेली आहे. त्यांच्यासाठी देखील, त्यांच्या भारतीय हवाई दलातील प्रत्यक्ष सेवेच्या कालावधीत महाराष्ट्र हा अनेक वर्षे महत्त्वाचे कार्यक्षेत्र राहिला आहे. याच राज्यातील पुणे येथे 40 च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी सैनिकी तुकडीचे पहिल्यांच नेतृत्त्व केले. दोन दशकांनंतर ते पुणे येथे हवाई दलाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी परतले, त्यावेळेपर्यंत पुणे हे हवाई दलाचा अत्यंत महत्त्वाचा सैनिकी तळ बनले होते. त्यानंतर 70 च्या दशकाच्या सुरूवातीपासून ते अगदी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरपर्यंत एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ, सेंट्रल एअर कमांड, नंतर एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ, मेंटेंनन्स कमांड आणि अंतिमत: (चिफ ऑफ एअर स्टाफ) हवाई दल प्रमुख म्हणून त्यांचे राज्याबरोबर असलेले संबंध अभंग व निकटचे राहिले.
एअर चिफ मार्शल लतिफ यांना घोडा चालविण्याची खूपच आवड आहे आणि ते क्रिकेट आणि टेनिस या खेळातही पारंगत होते. अगदी लहान मुलगा असल्यापासून, नंतरच्या वर्षातील विमान चालविण्याखेरीज त्यांना छायाचित्रणाचेही विलक्षण वेड होते. उर्दू कवितेचे त्यांचे प्रेम हे, त्यांनी त्यांच्या पत्नी बिलिक्स लतिफ यांच्याबरोबर वाटून घेतले.
मृदुभाषी असले तरी, एअर चिफ मार्शल लतिफ हे एक अत्यंत शिस्तप्रिय आहेत आणि एक गुणविशेष म्हणून वक्तशीरपणाला ते अतिशय महत्त्व देतात. माणसाच्या सभ्यतेवर त्यांचा विश्वास आहे, ध्येय गाठण्यासाठी ते मनुष्यप्राण्यांवर व त्यांच्यामधील सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. एखादा निर्णय घेण्यापूर्वी, मुक्त संवाद साधण्यास ते प्रोत्साहन देतात पण एकदा का एखादा निर्णय घेतला की, त्या निर्णयाचे कसोशीने पालन केले जावे अशी त्यांची अपेक्षा असते.