31.03.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवस तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन संपन्न

31.03.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवस तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे राजभवन मुंबई येथे उदघाटन संपन्न झाले. यावेळी नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी राज्यपालांच्या जॅकेटला राष्ट्रीय सागरी दिनाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली तसेच राज्यपालांना स्मृतिचिन्ह व कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे मुख्य सर्वेक्षक व अतिरिक्त महासंचालक अजित सुकुमारन, उपमहासंचालक पांडुरंग राऊत, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन बी के त्यागी, मुख्य जहाज सर्वेक्षक प्रदीप सुधाकर, उपमहासंचालक डॉ सुधीर कोहाकडे, उप नौकानयन सल्लागार कॅप्टन नितीन मुकेश, शिपिंग मास्टर मुकुल दत्ता, कॅप्टन संकल्प शुक्ल, नॅशनल युनिअन ऑफ सीफेअरर्सचे महासचिव मिलिंद कांदळगावकर आदी उपस्थित होते.