30.03.2024: राज्यपालांच्या हस्ते मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन
30.03.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ६१ व्या राष्ट्रीय समुद्री दिवस (नॅशनल मेरीटाईम डे) तसेच सप्ताहाचे (मर्चंट नेव्ही वीक) राजभवन येथे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी राज्यपालांच्या पोषाखाला मर्चंट नेव्हीचे बोधचिन्ह लावले. कार्यक्रमाला शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कॅप्टन बी के त्यागी, नॅशनल मेरीटाईम डे सेलिब्रेशन समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, उपमहासंचालक डॉ पांडुरंग राऊत, शिप सर्व्हेयर अनिरुद्ध चाकी, नॉटिकल सर्व्हेयर कॅप्टन मनीष कुमार, शिपिंग मास्तर मुकुल दत्ता व इतर अधिकारी तसेच जहाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.