30.03.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजस्थान दिवस संपन्न

30.03.2022: कुंदन सोशल फाउंडेशन व शेरी -दिया फाउंडेशनतर्फे राजस्थान दिवसाचे औचित्य साधून ‘एक शाम महाराणा प्रताप के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, हास्य कलाकार सुनील पॉल, माजी आमदार राजपुरोहित, कुंदन सोशल फाउंडेशनचे संस्थापक कुंदनमल जैन, अध्यक्ष अनिल जैन, शेरी-दिया फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश कोठारी, राजस्थानी गायक प्रकाश माला उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जॅकी श्रॉफ, रिद्धी सिद्धी बुलियनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी व बाबुलाल संघवी यांचा सत्कार करण्यात आला.