28.01.2024 : उपराष्ट्रपती यांच्या उपस्थितीत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद

28.01.2024 : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे आयोजित 84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद (AIPOC) आणि भारतातील राज्य विधान मंडळांच्या सचिवांच्या 60 व्या परिषदेला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विविध राज्यांच्या विधान मंडळांचे पीठासीन अधिकारी तसेच राज्य विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.