27.09.2021: राज्यपालांच्या हस्ते नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार प्रदान

27.09.2021: नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.