26.11.2023: राज्यपालांच्या हस्ते 6 व्या मुनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/MI9tkB7_GAY/mqdefault.jpg)
26.11.2023: 6 व्या मुनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी मुंबई येथे संपन्न झाला, यावेळी चित्रपट महोत्सवाचे निमंत्रक भजन सम्राट अनुप जलोटा, ज्युरी सदस्य पं. सुवाशित राज, महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष देवाशिष सरगम उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध गायक आगम निगम, गीतकार समीर अंजान, पार्श्वगायिका साधना सरगम, दिग्दर्शक सुधीर अत्तावर, अभिनेत्री निवेदिता तसेच उत्कृष्ट चित्रपटासाठी ‘मृत्योर्मा’चे निर्माते यांना सन्मानित करण्यात आले.