26.08.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ संस्थेच्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न
26.08.2023 : जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांच्या ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ या संस्थेतर्फे ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ या विषयावरील दोन दिवसांच्या सोळाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांनी नंदनवन परिसर, ठाणे येथे केले. उदघाटनाला जैन तेरापंथ समाजाचे अध्यात्मिक प्रमुख आचार्य महाश्रमण प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी साध्वी प्रमुखा श्री विश्रुत विभा, मुनी महावीर कुमार, तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, विश्वस्त चंद्रेश बाफना, रायपूरचे माजी महापौर गजराज पगारिया, मदन तातेड तसेच फोरमचे सदस्य व भाविक उपस्थित होते.