25.08.2024: पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे लखपती दीदी संमेलन संपन्न
25.08.2024: पंतप्रधान नरेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील जळगाव येथे लखपती दीदी संमेलन संपन्न झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकतेच लखपती झालेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींचा त्यांना प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशीही संवाद साधला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.