25.07.2021: कच्छ युवक संघातर्फे करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

25.07.2021: टेलीमेडिसिनच्या माध्यमातून करोना रुग्णांची तसेच गृह विलगीकरणात असलेल्या गरजू लोकांची सेवा करणाऱ्या मुंबईतील कच्छ समाजातील २४ डॉक्टरांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. माटुंगा वडाळ्याच्या नगरसेविका नेहल शाह, कच्छ युवक संघाचे अध्यक्ष धीरज छेडा, संस्थापक विश्वस्त तलाक्षी फुरिया, नवनीत प्रकाशाचे बिपीन गाला, जयंत छेडा, रिषभ मारू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.