25.03.2023: राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील करोना योद्ध्यांना ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार प्रदान
25.03.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज मुंबईतील करोना योद्ध्यांना ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि श्री षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सोसायटी व सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. आर. चिदंबरम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. रंगराज, उपाध्यक्ष एम. व्ही. रामनारायण व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, धारावी येथे सेवा बजावणारे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ अनिल पाचणेकर, पास्कल सलढाणा व दत्तात्रय सावंत यांना करोना योद्धा पुरस्कार देण्यात आले. ‘खाना चाहिए’ व ‘भजन समाज’ घाटकोपर या संस्थांना देखील करोना काळातील सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.