24.07.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आयकर विभागातर्फे आयोजित ‘आयकर दिवस’ साजरा
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/MPd761PzR3o/mqdefault.jpg)
24.07.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयकर विभागातर्फे आयोजित १६५ वा ‘आयकर दिवस’ समारोह कौटिल्य भवन, बीकेसी, मुंबई येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबई विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त राज टंडन, आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट सेंटरच्या प्रधान मुख्य आयुक्त जहानजेब अख्तर, एडेल्वाइज म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालिका राधिका गुप्ता, आयकर विभागाचे अधिकारी तसेच व्यापार – उद्योग संस्थांचे प्रतिनिधी व करदाते उपस्थित होते.