24.01.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण

24.01.2023: ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. मधुरा वेलणकर, अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांसह मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट विश्वातील कलाकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.