23.07.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
23.07.2024: राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या पूजेनंतर राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीचे दर्शन घेतले व हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव, प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते.राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.