23.07.2022 : १६६ व्या टिळक जयंतीनिमित्त राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन

23.07.2022 : लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्यपालांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली तसेच स्मृतीस्थळाजवळच्या जागेत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम, समितीचे पदाधिकारी तसेच मुंबई महानगर पालिका व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.