22.09.2024: राज्यपालांनी ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त बाल कर्करुग्णांची घेतली भेट
22.09.2024: ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त बाल कर्करुग्णांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते. यावेळी राज्यपालांनी लहान मुलांशी संवाद साधला व त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तु दिल्या. राज्यपालांच्या सूचनेनुसार सर्व मुलांना राजभवनची सैर करण्यात आली. कार्यक्रमाला कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे अध्यक्ष वाय.के.सप्रू, संस्थेच्या मुख्य अधिकारी अलका सप्रु बिसेन व कार्यकारी संचालिका निता मोरे उपस्थित होते.