22.01.2025: राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

22.01.2025: राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सत्कार करण्यात आला. वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांतांतर्फे नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह, आश्रमाच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष विष्णू सुरूम, ऑलिम्पिक स्पर्धेतील धावपटू कविता राऊत तुंगार तसेच नवनियुक्त आदिवासी आमदार उपस्थित होते. यावेळी राज्यातील १७ आदिवासी आमदारांचा सत्कार करण्यात आला.