22.01.2024 : राज्यपालांच्या हस्ते श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना
22.01.2024 : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली. राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला. राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांना कौतुकाची थाप दिली.