21.08.2022 : राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासातर्फे देण्यात येणारे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान
21.08.2022 : राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासातर्फे देण्यात येणारे राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले. आसाम मधील अग्रदूत वृत्तपत्र समूहाचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक कनकसेन देका यांना राज्यपालांच्या हस्ते बापूराव लेले राष्ट्रीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर, वियॉन वृत्त वाहिनीच्या व्यवस्थापकीय संचालिका पलकी शर्मा – उपाध्याय व जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल, राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाचे अध्यक्ष रवींद्र संघवी, उद्योजक मालव दाणी व पुरस्कार निमंत्रण समितीचे प्रमुख मधुसुदन क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होते.