21.06.2024: राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा
21.06.2024: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे योगसत्राचे आयोजन करण्यात आले. ‘कैवल्यधाम’ व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर योग या संस्थांतर्फे योगसत्राचे आयोजन करण्यात आले. भारतीय तटरक्षक दल, सूचना प्रसारण कार्यालय व राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राज्यपालांसह योगासने केली. यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे विश्वस्त आत्मप्रीत रक्षित, रतन लुणावत व अल्पा गांधी तसेच कैवल्यधाम योग संस्थेचे रवी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रवी दीक्षित व देवकी देसाई यांनी योगसत्राचे संचलन केले.