20.11.2021: राज्यपालांच्या हस्ते नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार प्रदान
20.11.2021: विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच करोना संसर्ग काळात आघाडीवर राहून नेतृत्व प्रदान करणाऱ्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते मुख्य सचिव सीताराम कुंटे, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, पालिकेचे अपर आयुक्त सुरेश काकाणी यांसह विविध क्षेत्रातील प्रशासकीय प्रमुखांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.