20.01.2025 : नॅबचा ७४ वा स्थापना दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण

20.01.2025 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या अंध व्यक्तींच्या शिक्षण, पुनर्वसन व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा ७४ वा स्थापना दिवस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या वरळी मुंबई येथील सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिक, कार्यकारी महासचिव डॉ विमल देंगडा, कार्यकारी संचालक पल्लवी कदम, संस्थेचे आश्रयदाते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध पारितोषिके वितरण करण्यात आली.