19.02.2025: जर्मनीत स्टेम सेल्स आणि कर्करोग क्षेत्रातील संशोधकांनी भारतीय कर्करोग तज्ञांसह राज्यपालांची भेट घेतली

19.02.2025: जर्मनीत स्टेम सेल्स आणि कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी आज भारतातील नामवंत कर्करोग तज्ञांसह महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. जर्मन कर्करोग संशोधन केंद्र (डीकेएफझेड) येथील स्टेम सेल्स आणि कर्करोग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि जेनाव्हिंटा हेल्थचे सह-संस्थापक प्रोफेसर डॉ. अँड्रियास ट्रम्प यांनी कर्करोग संशोधनावरील भारत जर्मन प्रकल्प आणि कर्करोग निदान – उपचार क्षेत्रातील उत्साहवर्धक प्रगतीबद्दल राज्यपालांना यावेळी माहिती दिली. यावेळी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. सेवंती लिमये, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. अशोक मेहता, जर्मन कर्करोग संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर विशहुसेन, जेनाविंटा हेल्थचे सह-संस्थापक डॉ. शुभंकर सूद आणि फिजिओथेरपिस्ट हेईडी ट्रम्प हे देखील उपस्थित होते.