18.07.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत व्हिला टेरेसा शाळेचा वार्षिक दिन व पुरस्कार सोहळा संपन्न
18.07.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील व्हिला टेरेसा हायस्कूलचा वार्षिक दिवस तसेच पुरस्कार वितरण समारोह शाळेच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील मुलींना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. व्हिला टेरेसा शाळेच्या स्थापनेला यंदा ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत व शाळेच्या कॉन्व्हेंट व हॉस्टेलच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाला शासनाच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुसी शाह, सेंट टेरेसा हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर बबिता अब्राहम, सिस्टर संजीता कुजूर, प्रशासन अधिक्षिका सिस्टर लिमा रोज तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.