16.12.2022: राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या नवीन सचिवालय इमारतीचे उदघाटन; मुख्यमंत्र्यांनी केली राज्यपालांसह पाहणी
16.12.20222:राज्यपालांच्या सचिवालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दौऱ्यावर जाणार असल्यामुळे त्यांनी सकाळीच राजभवन येथे जाऊन राज्यपालांसह नव्या सचिवालय इमारतीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत बंदरे व खाणकाम मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व महिला बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.