16.11.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत भारतीय राजस्व सेवेच्या ७७ व्या तुकडीच्या कार्यक्रमाचा आरंभ
16.11.2023 : राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे सुरु होत असलेल्या भारतीय राजस्व सेवेच्या ७७ व्या तुकडीच्या ९० अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएडीटीच्या सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले. उदघाटन सत्राला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य (प्रशासन) रवि अग्रवाल, प्रधान महासंचालक (प्रशिक्षण) जयंत दिड्डी, एडीजी (प्रशासन) मुनीश कुमार, एडीजी (इंडक्शन) शिद्दरामप्पा कप्पत्तनावार, कोर्स निदेशक प्रदीप एस., अध्यापक, ७६ व्या व ७७ व्या तुकडीतील भारतीय राजस्व सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी व त्यांचे पालक उपस्थित होते.