16.01.2024 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
16.01.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठ पुणे या विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारोह ताथवडे पुणे येथील विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे कुलपती प्रा. बी. परमानंदन, कुलगुरू प्रा. जी. के. शिरुडे, कुलसचिव डॉ. एस. बी. आगाशे, परीक्षा नियंत्रक डॉ. मित्तल मोहिते, कॉर्पोरेट संपर्क संचालक डॉ. डिम्पल सैनी, अधिष्ठाता डॉ. बिजू पिल्लई तसेच स्नातक व निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएच.डी. तसेच गुणवत्ता प्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली.