15.08.2024 : राज्यपाल राधाकृष्णन यांचे अजित पवार यांचेसह पुणे येथे ध्वजारोहण

15.08.2024 : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह पुणे येथील विधान भवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस बॅन्डसह लोकांनी राष्ट्रगीत व राज्य गीत म्हटले. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी तसेच नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.