15.06.206: राज्यपालांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव समारंभ संपन्न
15.06.206: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांचा नव्या शैक्षणिक सत्रातील प्रवेशोत्सव समारंभ आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्यपालांनी शाळेतील प्रवेशाच्या प्रक्रियेचे अवलोकन करुन खगोलशास्त्र प्रयोगशाळा, पूर्व-प्राथमिक (बालवाडी) वर्ग, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, एफएलएन प्रयोगशाळा आदींची यावेळी पाहणी केली. राज्यपालांच्या हस्ते मुलांना शालेय वस्तूंचे तसेच मध्यान्ह भोजनाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्त अश्विनी भिडे, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शिक्षण) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे (MPSP) राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती यांच्यासह शिक्षक, पालक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.