15.01.2025: पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचे उदघाटन

15.01.2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचे उदघाटन संपन्न झाले. कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमा मालिनी व इस्कॉनचे गुरुप्रसाद स्वामी व निमंत्रित उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई येथे आगमनप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.